News Flash

यंदा भाविकांनी थेट प्रेक्षपणाद्वारेच माऊलींना सेवा अर्पित करावी : पोलीस उपायुक्त स्मिता पाटील

आळंदीमध्ये प्रवेश केल्यास कारवाई होणार, तसेच, १४ दिवस क्वारंटाइन देखील करण्यात येणार

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी (पादुका) सोहळ्याचे प्रस्थान  १३ जून रोजी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित होणार असून, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी आळंदीमध्ये न येता  जिथे वास्तव्यास आहेत तिथूनच थेट प्रेक्षपणाद्वारे, यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्याची पूजा आणि सेवा अर्पित करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी केले आहे. दरम्यान, आळंदीमध्ये प्रवेश केल्यास नागरिक, भाविकांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येईल. तसेच,  ना विलाजास्तव  कारवाई करावी लागेल अस त्यांनी स्पष्ट केले आहे.

उपायुक्त स्मिता पाटील  म्हणाल्या की, महाराष्ट्रातील वारकरी  संप्रदाय व भाविकांना आवहन करण्यात येते की,  घरी राहून च पालखी सोहळ्यासाठी सेवा द्यावी. मंदिराच्या शेजारील परिसर  प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.  करोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे. कृपया भाविकांनी आळंदीकडे येऊ नये. सर्व धार्मिक स्थळ, हॉटेल्स, लॉज बंद करण्यात आले आहेत. आळंदीमध्ये प्रवेश बंदी आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुका प्रस्थान सोहळा याला शासनाने परवानगी दिलेल्या विश्वस्त, सेवेकरी आणि वारकरी जे मंदिरातच राहात यांच्या मार्फत केला जाणार आहे.

पादुका प्रस्थानंतर मंदिराची प्रदक्षिणा घालून आजोळ घराच्या देऊळ वाड्यामध्ये पादुका ठेवण्यात येणार आहेत अस त्या म्हणाल्या. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून च नागरिकांनी पूजा आणि सेवा अर्पित करावी. यावर्षी करोना चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हे पाऊल उचलली जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 4:37 pm

Web Title: this year devotees should offer services to mauli only through live broadcast deputy commissioner of police smita patil msr 87 kjp 91
Next Stories
1 देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान मोदी जबाबदार : पृथ्वीराज चव्हाण
2 यंदा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार प्रस्थान!
3 धक्कादायक! पुण्यात आढळलेल्या ‘त्या’ बनावट नोटांची किंमत तब्बल ८७ कोटी
Just Now!
X