News Flash

लग्नास नकार देणार्‍या तरुणीवर ॲसिड हल्ल्याची धमकी

हडपसर पोलिसांकडून आरोपी तरुणास अटक

प्रतीकात्मक छायाचित्र

लग्नास नकार दिल्याने तुझ्या अंगावर ॲसिड टाकेन, तुझ्या वडिलांना ठार मारेन अशी धमकी दिल्याची घटना पुण्यातील हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणी आरोपीस हडपसर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अरुण बाबासाहेब खडतरे (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीची आरोपी अरुण सोबत तोंड ओळख होती. तो तिला अनेक वेळा त्रास देत असे, त्याच दरम्यान २० ऑक्टोबरला तिच्या घरी गेला.

त्यावेळी फिर्यादीच्या आई वडिलांना ढकलून दिले, राडा घातला आणि जर लग्नास होकार न दिल्यास तुझ्या वडिलांना ठार मारून टाकेल. तसेच तुझ्यावर अंगावर ॲसिड टाकेन, असे म्हणत तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी तरुणास अटक करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 2:07 pm

Web Title: threat of acid attack on a young woman in pune who refuses to marry scj 81 svk 88
Next Stories
1 पुणे-मुंबई प्रवासासाठी भुर्दंड
2 बिस्कीटहट्टामुळे अनेक आजारांना निमंत्रण
3 पुणे-लोणावळा लोकलफेऱ्यांत चारने वाढ
Just Now!
X