News Flash

पानशेत पाणलोट क्षेत्रात मोटार कोसळून महिलेसह तीन मुलींचा मृत्यू

मोटारचालक जखमी

प्रातिनिधीक छायाचित्र

पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोटार कोसळून आईसह तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. अपघातात मोटारचालक  जखमी झाला आहे.

अल्पना विठ्ठल (वय ४५), प्राजक्ता विठ्ठल भिकुले(वय २१), प्रणिता विठ्ठल भिकुले(वय १७), वैदेही विठ्ठल भिकुले(वय ८, सर्व रा. चव्हाणनगर, धनकवडी) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अल्पना यांचे मोटारचालक पती विठ्ठल (वय ४६) हे बचावले असून ते जखमी झाले आहेत. भिकुले कुटुंबीय मूळचे वेल्हा तालुक्यातील आहेत. विठ्ठल, त्यांची पत्नी आणि तीन मुली गावी गेले होते. शुक्रवारी (२ एप्रिल)  सर्व जण गावावरून पुण्याकडे परतत होते. उरण फाटय़ाजवळ मोटारचालक विठ्ठल यांचे नियंत्रण सुटले आणि मोटार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडली.

या भाागातील ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वेल्हे पोलिसांना दिली. त्यानंतर वेल्हे पोलीस आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडी) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मोटारीतील चौघांचा शोध घेण्यात आला. अल्पना, त्यांचे पती आणि तीन मुलींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अल्पना, प्राजक्ता, प्रणिता, वैदेही यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने  वेल्हे तालुक्यात शोककळा पसरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:51 am

Web Title: three girls including a woman were killed when a car crashed in the panshet catchment area abn 97
Next Stories
1 पुण्यात कठोर निर्बंध
2 संवादिनी सर्वोत्तमाला अनुयायांची शब्दांजली
3 राज्यभर गरवी कांदा मुबलक
Just Now!
X