22 October 2020

News Flash

लघुउद्योग, व्यावसायिकांना तीन महिने मिळकतकरात माफी

पिंपरी महापालिकेतील सत्तारूढ भाजपचा महत्त्वपूर्ण निर्णय

पिंपरी पालिका मुख्यालयात सत्ताधारी भाजप नेत्यांची पालिका आयुक्तांसमवेत बैठक झाली.

करोनामुळे नुकसान झालेल्या उद्योगांना तथा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी आगामी तीन महिने मिळकतकर माफ करण्याचा निर्णय सत्तारूढ भाजपने घेतला आहे. त्यानुसार, पिंपरी पालिकेच्या हद्दीतील सुमारे ६० हजार मिळकतींना ही करमाफी मिळू शकणार आहे.

शहरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे आदी उपस्थित होते.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच उद्योगधंदे, व्यवसाय दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसलेला आहे. या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. अशा परिस्थितीत, त्यांना दिलासा देण्यासाठी सर्व लघुउद्योग आणि बिगरनिवासी व्यावसायिक मिळकतींना तीन महिन्यांचा मिळकतकर माफ करण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी बैठकीत घेतला. या बाबतची प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे पक्षनेते नामदेव ढाके यांनी  सांगितले.

शहरात परप्रांतातून आलेले नागरिक मोठय़ा संख्येने राहतात. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी महापालिकेकडून मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी महापौर निधीतून रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे.

चिंचवडचे आनंदनगर, पिंपरीतील भाटनगरसारख्या  झोपडपट्टी भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. तेथे धारावीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 12:15 am

Web Title: three months income tax exemption for small scale businesses abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 पुण्यातून विशेष रेल्वेला बिहारसाठी सर्वाधिक मागणी
2 शहर पोलीस दलातील आणखी एका करोनाबाधित कर्मचाऱ्याचा मृत्यू
3 पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने ठराविक वेळेत राहणार खुली
Just Now!
X