05 March 2021

News Flash

Coronavirus : पुण्यात आणखी तिघांचा बळी, आत्तापर्यंत एकूण ४७ मृत्यू

राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.

संग्रहित छायाचित्र

 राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा देखील रोज वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहर याबाबतीत सध्या आघाडीवर आहेत.  पुण्यात देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच वाढत आहे. आज शहरात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर शहरातील एकूण मृतांची संख्या 47 वर पोहचली आहे.

आज मृत्यू झालेल्यांमध्ये गंजपेठ परिसरातील 54 वर्षीय पुरूष व कोंढवा येथील 47 वर्षीय महिलेचा व  शहरातील गुलटेकडी भागातील एका 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

 शहरासह जिल्ह्य़ातील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहराचे तीन भाग (रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन) घोषित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुण्यातील करोनाच्या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून विस्तृत अहवाल मागितला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी राम यांनी याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.

बुधवारी महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ९ मृत्यू झाले होते. शिवाय बुधवारी एकाच दिवशी २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले होते. गुरुवारी त्यात आणखी १६५ जणांची भर पडली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 4:33 pm

Web Title: three more victims total death toll at 47 in pune msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीसह चौघांना करोनाचा संसर्ग
2 Lockdown: पोलिसांकडून कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकीन, साड्यांचे वाटप
3 पुण्यात लॉकडाउनमध्ये सिगारेटचा पुरवठा, धाड टाकून डीलरला अटक; ३९ लाखांच्या सिगारेट जप्त
Just Now!
X