दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीतील लघुचित्रे

पुणे : परदेशातील संग्रहालयांमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची तीन समकालीन चित्रे पुण्यातील इतिहास संशोधक प्रसाद तारे यांनी प्रकाशात आणली आहेत. दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीतील ही चित्रे १७ व्या शतकातील असून ती लघुचित्रे (मिनीएचर पेंटिंग) स्वरूपात आहेत. भारतामध्ये आलेल्या तत्कालीन युरोपीयन व्यापाऱ्यांमार्फत प्रथम ही लघुचित्रे युरोपमध्ये हस्तांतरित झाली. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका येथे ही चित्रे सुरक्षितपणे जतन करण्यात आली आहेत.

शिवकाळात भारतामध्ये अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या. त्यापैकी कुतूबशाहीची राजधानी असलेल्या गोवळकोंडा येथील चित्रशैलीला दख्खनी गोवळकोंडा चित्रशैली संबोधिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर गेले असताना ही चित्रे काढली गेली आहेत. किंवा त्यावेळी चितारल्या गेलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने ही चित्रे काढली गेली असावीत. ही तीनही चित्रे जलरंगातील असून सोन्याने रंगविली आहेत. या चित्रांचे चित्रकार अज्ञात आहेत, अशी माहिती प्रसाद तारे यांनी सोमवारी दिली. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे या वेळी उपस्थित होते.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयामध्ये असलेल्या चित्रामध्ये केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये दाखविण्यात आली आहे. फ्रान्समधील पॅरिस येथील खासगी वस्तुसंग्रहालयामध्ये असलेल्या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातामध्ये पट्टा हे शस्त्र दाखविले आहे. संग्रहालयातील नोंदीनुसार त्यांच्या डाव्या हातामध्ये मोरपिसाप्रमाणे कोणत्या तरी पक्ष्याचे शोभेचे पीस दाखविण्यात आले आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील संग्रहालयामध्ये असलेल्या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये पट्टा हे शस्त्र आणि कमरेला कटय़ार दाखविली आहे. पॅरिस आणि फिलाडेल्फिया येथील चित्रांमध्ये पर्शियन आणि रोमन लिपीमध्ये शिवाजी महाराजांचे नाव लिहिलेले आहे, असे तारे यांनी सांगितले.

मराठी माणसांसाठी अभिमानास्पद

छत्रपती शिवाजी महाराज यांची जगभरात २७ चित्रे प्रसिद्ध आहेत. या तीन अप्रकाशित चित्रांची भर पडण्यासाठी तारे यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. परदेशात असलेली ही चित्रे मराठी माणसांसाठी अभिमानास्पद आहेत, असे पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी संग्रहालय येथील चित्रांशी ही मिळतीजुळती चित्रे आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

या लघुचित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार आणि पायामध्ये मोजडी आहे. कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी आणि गळ्यात मोत्यांच्या दोन माळा असे मोजकेच अलंकार परिधान केले असल्याचे दिसून येते. करारी मुद्रा, बोलके डोळे आणि स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्कालीन वर्णनामध्ये आढळणारी वैशिष्टय़े या चित्रांमध्येही दिसतात.

 प्रसाद तारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांचे अभ्यासक