उद्याने, कॅ ब, व्यापारी क्षेत्रे, खासगी कार्यालये, मंडई, बाजारपेठा तीन टप्प्यात सुरू करण्याचे नियोजन

पुणे : टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात तीन टप्प्यात व्यवहार सुरू करण्यास महापालिके ने मंगळवारी मान्यता दिली. त्यानुसार उद्याने, मैदाने, टॅक्सी, कॅ ब, रिक्षा, बाजारपेठा, मंडई, खासगी कार्यालये ८ जून पर्यंत टप्प्याटप्पाने सुरू करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे सुधारित आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले. प्रतिबंधित क्षेत्र वगळून शहराच्या अन्य भागात या सवलती सुरू राहणार असून बुधवारपासून (३ जून) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी
Liquor Licenses pune
पुण्यात ४ जूनपर्यंत दारूचे नवे परवाने, रिन्युएशन बंद

करोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. राज्य शासनानेही त्याला मान्यता दिली असून टाळेबंदीच्या कालावधीत कोणत्या सवलती मिळणार, कोणत्या सुविधा सुरू राहणार, याची नियमावली राज्य शासनाने जाहीर के ली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी शहरात कोणत्या सवलती मिळणार, याबाबतचे सुधारित आदेश काढले. ३ जून, ५ जून आणि ८ जून असे शिथलीकरणाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. करोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या नियमांचे आणि अटींचे पालन करण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे.

३ जूनपासून

* घराबाहेरील व्यायाम- सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे आदी वैयक्तिक व्यायामप्रकार खासगी, सार्वजनिक मैदानात करण्यास मुभा देण्यात आली आहे. महापालिके ची सर्व उद्याने, मैदाने, संस्था-सोसायटय़ांची मैदाने, उद्यानांचा त्यासाठी वापर करता येणार आहे. क्रीडांगणाच्या बंदिस्त भागात व्यायामप्रकार करण्यास मनाई आहे. सामुदायिक स्वरूपात उद्यानांचा वापर करण्यास मनाई आहे.

* व्यवसायास मान्यता-  प्लंबर, विद्युत विषयक कामे करणारे कर्मचारी, पेस्ट कं ट्रोल, अन्य तांत्रिक

स्वरूपाचे व्यवसायही सुरू करण्यास सवलत देण्यात आली आहे.

* शासकीय कार्यालये- सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के  किं वा पंधरा कर्मचारी या पैकी जी संख्या जास्त असेल त्यानुसार कार्यालये सुरू करता येऊ शकतील. वेळ- पहाटे ५ ते सायंकाळी ७

५ जूनपासून

* बाजारपेठा- मॉल, व्यापारी संकु ल वगळता अन्य व्यापारी क्षेत्रे, तुळशीबाग, हाँगकाँग लेन या सारखी ठिकाणे आणि रस्त्यावरील दुकाने आळीपाळीने सुरू राहणार आहेत. मुख्य रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम दिनांकाच्या दिवशी आणि दुसऱ्या बाजूची दुकाने विषम दिनांका दिवशी उघडतील. मुख्य रस्ता पूर्व-पश्चिम असल्यास दक्षिण बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर उत्तर बाजूकडील दुकाने विषम दिनांकास उघडतील. मुख्य रस्ता दक्षिण-उत्तर असेल तर पूर्व बाजूकडील दुकाने सम दिनांकास आणि पश्चिम बाजूकडील दुकाने विषम दिनांकास उघडी राहतील. (वेळ- सकाळी ९ ते सायंकाळी ५)

* मंडई- महापालिके च्या मंडईमधील सम क्रमांकाचे गाळे सम दिनांकांना तर विषम क्रमांकाचे गाळे विषम दिनांकाना सुरू राहतील. (वेळ- सकाळी ९ ते सायंकाळी ५)

* वाहतूक- टॅक्सी किं वा कॅ ब, रिक्षा, चारचाकी स्वयंचलित वाहन, दुचाकी वापरासही मान्यता देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅ ब, रिक्षा, चारचाकींमध्ये वाहनचालक आणि के वळ दोन प्रवासीच प्रवास करू शकतील. दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करता येईल.

८ जूनपासून

* खासगी कार्यालये- खासगी कार्यालये १० टक्के  कर्मचाऱ्यांसह सुरू करता येतील.

प्रतिबंधित क्षेत्रासाठी

प्रतिबंधित क्षेत्रात किराणा दुकान, भाजीपाला विक्री, औषध दुकाने, दवाखाने, दूध, रेशन दुकाने आदी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत उघडी राहणार आहेत. शहरातील यापूर्वीच्या ६५ प्रतिबंधित क्षेत्रातून २७ क्षेत्रे वगळण्यात आली असून २८ क्षेत्रांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्राचीही पुनर्रचना करण्यात आली आहे.