सहलीसाठी मुळशी धरण परिसरात आलेल्या भारती विद्यापीठाच्या दहा जणांच्या ग्रुपमधील तीन विद्यार्थ्यांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मुले आणि एका मुलीचा समावेश असून या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी वळणे गावात ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभमराज सिन्हा (मुळ बिहार), संगीता नेगी (मुळ दिल्ली), शिवकुमार (मुळ उत्तर प्रदेश) (तिघेही वय वर्षे २२) अशी बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही भारती विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत होते. गुरुवारी सकाळी सात वाजता भारती विद्यापीठाची ५ मुलं आणि ५ मुली असे दहा विद्यार्थ्यी सहलीसाठी मुळशी धरण परिसरात आले होते.

सकाळीच यातील काही जण पोहोण्यासाठी धरणात उतरले. पोहता येत नसल्याने यातील दोन मुले आणि एक मुलगी पाण्यात बुडाले. यातील एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाला यश आले आहे. इतर दोघांचा शोध सुरु आहे. पौड पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. पीएसआय धुमाळ यांनी ही माहिती दिली.