जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून ‘द टेरिटरी’ संस्थेतर्फे बुधवारी (२९ जुलै) युवा छायाचित्रकारांनी टिपलेल्या वन्य प्रदेशातील भटकंतीवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आदित्यराज गुजर, करणराज गुजर, नचिकेत उत्पात, शैलेश गायकवाड आणि श्वेता गोपालकृष्णन यांनी टिपलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे. पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनातील राजारवि वर्मा कलादालन येथे सकाळी दहा ते रात्री साडेआठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये ६० छायाचित्रांचा समावेश असून त्यापैकी वाघाची २५ छायाचित्रे असतील. भविष्य काळात वाघांचे अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे हा संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आदित्यराज गुजर यांनी शनिवारी सांगितले.