News Flash

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी स्वतःच्या पत्नी-चिमुकल्याला संपवलं, हिंजवडीत धक्कादायक प्रकार

हत्येप्रकरणी चारही आरोपी पोलिसांच्या अटकेत

२४ तासांच्या आत पोलिसांनी हत्येमागील आरोपींचा शोध घेतला आहे

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी आपल्याच पत्नी आणि दहा महिन्याच्या मुलाची हत्या करवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडे भागात घडला आहे. दत्ता भोंडवे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी याप्रकरणात दत्तासह त्याची प्रेयसी व दोन मारेकऱ्यांना अटक केली आहे.  ही घटना शनिवारी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास नेरे गावाच्या परिसरात घडलेली आहे. सुरुवातीला दत्ताने आपल्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला करुन पत्नी-मुलाची हत्या केल्याचा बनाव रचला होता, मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दत्ताने गुन्ह्याची कबुली दिली.

३० वर्षीय दत्ता भोंडवेचे लग्नानंतरही एका महिलेशी प्रेमसंबंध होते. पत्नीचा काटा काढल्यानंतरच तुझ्याशी लग्न करता येईल असं दत्ताने आपल्या प्रेयसीला सांगितलं होतं. यानंतर दोघांनी मिळून ५०-५० हजार रुपयांची सुपारी देत दत्ताची पत्नी आश्विनी व मुलगा अनुजच्या हत्येचा कट रचला. आपल्या पत्नी आणि मुलासह सासुरवाडीवरुन परतत असताना दत्ता भोंडवेने पाणी पिण्याच्या बहाण्याने मुंबई-बंगळुरु महामार्गावर गाडी थांबवली. यावेळी दोन अज्ञात इसमांनी गाडीत शिरुन आश्विनी भोंडवे यांच्या तोंडावर रुमाल ठेवत गाडी जांभे गावाच्या पुढे नेण्याची धमकी दिली.

मात्र ही गाडी नेरे रोडवर आली असतान दोन्ही मारेकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने आश्विनीचा गळा आवळून खून केला. यावेळी गाडीत असलेला दहा महिन्याचा अनुज रडायला लागल्यामुळे, त्याला गप्प करण्यासाठी दोन्ही मारेकऱ्यांनी त्याचीही हत्या केली. दोघांचीही हत्या केल्यानंतर दत्ताने गाडीतील रोखरक्कम चोरीला गेल्याचाही बनाव रचला. मात्र पोलिसी खाक्यापुढे या आरोपींचं काहीही चालू शकलं नाही. या प्रकरणी सध्या चारही आरोपी हिंजवडी पोलिसांच्या अटकेत आहेत

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2018 12:59 pm

Web Title: to marry his girlfriend man in pune district plot a murder of wife and 10 month old son police arrest all 4 accused
Next Stories
1 सरकारचा दंगल घडवण्याचा प्रयत्न हाणून पाडा
2 सक्षम पर्याय आणि उत्तम रोजगारही
3 शिरूरजवळ साकारली झीरो एनर्जी शाळा
Just Now!
X