02 March 2021

News Flash

पुण्यात दिवसभरात 318 करोनाबाधित, 10 जणांचा मृत्यू

एकूण करोनाबाधितांची संख्या 5 हजार 851 वर पोहचली

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यात आज दिवसभरात 318 नवे करोना रुग्ण आढळले. तर,  10 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या 5 हजार 851 एवढी  झाली आहे. तर आतापर्यंत 293 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज उपचार घेत असलेल्या 205 रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर 3 हजार 264 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

राज्यात आज 2 हजार 598 करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. याचबरोबर एकूण संख्या आता 59  हजार 546 अशी झाली आहे. तर दुसरीकडे  आज 698 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत उपचारानंतर  बरे होऊन घरी पाठविण्यात आलेल्यांची संख्या एकूण 18 हजार 616 झाली आहे. सद्यस्थितीस राज्यात एकूण 38 हजार 939 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 9:25 pm

Web Title: today 318 new corona patients found in pune 10 died msr svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 औद्योगिक नगरीतून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचा मालही ‘एसटी’ राज्यभरात पोहचवणार
2 आगामी काळात कृषी विभागासाठी लॉकडाउन नसणार : कृषीमंत्री दादा भुसे
3 पुण्यात पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची कोयत्यानं वार करून हत्या
Just Now!
X