लोकमान्य टिळकांचे राजकारण, गणिताभ्यास, लेखन, अर्थविचार, पत्रकारिता अशा विविध पैलूंचा वेध घेणाऱ्या ‘एकमेव लोकमान्य’ या लोकसत्ताने तयार केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन आज (१ ऑगस्ट) ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे होणार आहे. लोकमान्यांनी लिहिलेल्या निवडक आणि गाजलेल्या अग्रलेखांचे अभिवाचन मराठी सिने-नाटय़सृष्टीतील मान्यवर कलावंत करणार आहेत.

लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षांनिमित्त लोकसत्ताने ‘एकमेव लोकमान्य’ हा विशेषांक तयार केला आहे. लोकमान्यांच्या कार्यकर्तृत्वाचा धांडोळा या विशेषांकात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेखकांनी घेतला आहे. त्यामुळे लोकमान्यांना आजच्या संदर्भात समजून घेण्यासाठी हा विशेषांक महत्त्वाचा आहे.

भाषावैभवाची अनुभूती..

ज्येष्ठ गायक अभिनेते चंद्रकांत काळे, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक अभिनेते गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि नाटय़निर्माते अजित भुरे, लोकमान्यांची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार निवडक अग्रलेखांचे वाचन करणार आहेत. त्यामुळे लोकमान्यांचे सडेतोड विचार, परखड मांडणी, भाषावैभवाचा अनुभव रसिकांना या अग्रलेखांच्या वाचनातून निश्चितपणे येईल.

आजपासून उपलब्ध.. भारतीय जनमनांत बाळ गंगाधर टिळक या नावाने जी उंच पताका फडकते आहे, तिचे विचारदर्शन घडविणारा हा विशेषांक आजपासून सर्वत्र उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात तसेच देशात  हा विशेषांक मिळवण्यासाठी ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाइन विक्री यंत्रणेमार्फत व्यवस्था करण्यात आली आहे.

* प्रस्तुत – लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.

* सहप्रायोजक – ग्रॅव्हिटस कॉर्प. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी

* पॉवर्ड बाय – दि टिळक क्रॉनिकल्स आणि पिंपरी-चिंचवड  एज्युकेशन ट्रस्ट

* ऑडिओ बुक पार्टनर – स्टोरीटेल अ‍ॅप

सहभागी होण्यासाठी : https://tiny.cc/LS_EkmevaLokmanya_1Aug  येथे नोंदणी आवश्यक.