मेट्रोच्या कामांमुळे होणाऱ्या कोंडीवर तोडगा

कर्वे रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे परिसरातील गल्लीबोळात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या परिसरातील वाहतुकीमध्ये काही बदल करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. खिलारे पथावरील पाडळे पॅलेस चौक ते सेंट्रल मॉल या दरम्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Passengers are monitored through cameras based on AI technology in Pune railway station
सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत
Development of six villages
बीकेसीच्या धर्तीवर मढ, मार्वेसह सहा गावांचा विकास लांबणीवर?

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत कर्वे रस्त्यावर वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत असून गल्लीबोळात वाहनांच्या रांगा लागत आहेत. या पाश्र्वभूमीवर काही उपाययोजना करण्यासाठी या परिसरातील स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, जयंत भावे, दीपक पोटे यांनी त्यानुसार वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांच्यासमवेत पाहणी केली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, तसेच संजय देशपांडे उपस्थित होते.

म्हात्रे पुलावरून तसेच मेहेंदळे गॅरेज चौकातून आणि हॉटेल निसर्गच्या गल्लीतून येणाऱ्या वाहनांना पाडळे पॅलेस चौकातून उजवीकडे वळण्यास म्हणजेच खिलारे पथावर जाण्यासाठी बंदी करण्यात येणार आहे. या मार्गावरून येणाऱ्या वाहनचालकांनी नळस्टॉप चौकातून यू टर्न घेऊन खिलारे पथावर यावे यासाठी नळ स्टॉप चौकातील सिग्नलची वेळ वाढविण्यासही तत्त्वत: मान्यता देण्यात आली. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे.

विविध कामे होणार?

पाडळे पॅलेस चौकात असलेले सर्कल लहान करणे, पाडळे पॅलेस ते गरवारे कॉलेज रस्ता रुंदीकरण करणे, हा रस्ता नो पार्किंग नो हॉल्टिंग करणे, रस्त्यावरील हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाल्यांचे पुनर्वसन करणे, नळस्टॉप चौकातील शौकीन पान समोर नो पार्किंग करणे याबरोबरच कर्वे रस्त्यावरील पदपथांचा आकार लहान करून वाहनांसाठी जादा मार्गिका उपलब्ध करून देणे यावर एकमत झाले आहे. त्यानुसार महापालिकेच्या संबंधित खात्यांना त्याबाबत पत्र देण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी दिली.