20 September 2018

News Flash

संततधार पावसामुळे वाहतूक कोंडी

शहरात सोमवारी सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. सकाळी दहाच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

(संग्रहित छायाचित्र)

शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी; मुंबई-बंगळुरू मार्गावर दोन ट्रक बंद

HOT DEALS
 • Honor 9I 64GB Blue
  ₹ 14790 MRP ₹ 19990 -26%
  ₹2000 Cashback
 • Honor 8 32GB Pearl White
  ₹ 14210 MRP ₹ 30000 -53%
  ₹1500 Cashback

संततधार पावसामुळे सोमवारी शहराच्या सर्व भागांत कोंडी झाली. मुंबई-बंगळुरू बाह्य़वळण मार्गावर वारजेनजीक दोन ट्रक बंद पडल्याने या रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. त्यामुळे बाह्य़वळण मार्गालगत असलेल्या सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

शहरात सोमवारी सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. सकाळी दहाच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे वाहतुकीचा  वेग मंदावला. वाहतुकीचा वेग मंदावल्याने सिंहगड रस्ता, पौड रस्ता, नगर रस्ता, जंगली महाराज रस्ता, शहराच्या मध्य भागात कोंडी झाली. मुंबई-बंगळुरू बाह्य़वळण मार्गावर वारजेनजीक दोन ट्रकचे टायर फुटल्याने बाह्य़वळण मार्गाने जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे बाह्य़वळणावरून जाणारी वाहतूक सिंहगड रस्ता, वारजे भागातून कोथरूडच्या दिशेने वळविण्यात आली. वाहतुकीचा ताण वाढल्याने सिंहगड रस्त्यावरील कोंडीत भर पडली.

शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला होता. पाऊस सुरू असल्याने अनेकजण मोटारी घेऊन बाहेर पडले. शहरातील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने पोलिसांनी काही प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा बंद ठेवून या भागातील वाहतूक कोंडी तातडीने हटविण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यामुळे ज्या भागात कोंडी झाली होती, तेथील कोंडी हटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले होते. संततधार पाऊस सुरू असल्याने शहराचा सर्व भागात वाहतूक पोलिसांना रस्त्यावर थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी जंगली महाराज रस्ता भागात पुन्हा कोंडी झाली. वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने कोंडी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कामाच्या पहिल्या दिवशी ‘लेटमार्क’

सोमवारी कामाचा पहिला दिवस असल्याने अनेक नोकरदार नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊच्या सुमारास घरातून बाहेर पडले. विशेषत: सिंहगड रस्ता भागात सोमवारी सकाळी मोठी कोंडी झाली होती. सिंहगड रस्त्यावरून शहराच्या मध्य भागात पोहोचण्यासाठी अनेकांना तासभर लागला. कामाच्या पहिल्या दिवशी अनेकांचे ‘ लेटमार्क’लागले, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.

का होते वाहतूक कोंडी ?

 • संततधार पावसामुळे वाहतूक संथ गतीने
 • संथ वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी
 • पावसामुळे सिग्नल यंत्रणा बंद
 • भररस्त्यात वाहने बंद पडल्यामुळे कोंडीत भर
 • पावसात मोटारींचा वापर जास्त
 • बेशिस्तीने कोंडीत भर

संततधार पावसामुळे सोमवारी शहराच्या सर्व भागांत वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. अनेकजण मोटारीतून आल्याने कोंडीत भर पडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सोमवारी सकाळी सिंहगड रस्त्यावर झालेल्या कोंडीचे हे छायाचित्र.

First Published on August 14, 2018 2:08 am

Web Title: traffic collision due to the continuous rains