News Flash

मतमोजणीसाठी उद्या कोरेगाव पार्क, बालेवाडी भागातील वाहतुकीत बदल

या भागातील वाहतुकीमध्ये शुक्रवारी बदल करण्यात येणार आहे. काही रस्त्यांवर वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी याबाबतची माहिती

| May 15, 2014 03:13 am

कोरेगाव पार्क भागातील वखार महामंडळाचे गोडाऊन व बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात लोकसभा निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याने या भागातील वाहतुकीमध्ये शुक्रवारी बदल करण्यात येणार आहे. काही रस्त्यांवर वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी याबाबतची माहिती दिली. वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पुणे व बारामती, तर बालेवाडी येथे मावळ व शिरूर या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.
वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते
गल्ली क्रमांक आठ जंक्शन ते साऊथ मेन रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई राहील. (निवासस्थानी जाणाऱ्या नागरिकांना वगळून). साऊन मेन रस्त्याची पूर्व बाजू ते गल्ली क्रमांक ४ या भागात वाहनांना प्रवेश नाही. संत गाडगेमहाराज शाळेशेजारील परिसरात राहणाऱ्या नागरिकांना साई मंदिरापासून एफसीआय गोडाऊनकडे जाण्यास मनाई राहील. त्यांनी साईमंदिर ते साऊथ मेन रोड ते गल्ली क्रमांक २ ते गल्ली क्रमांक १ या मार्गाचा वापर करावा. नाला गार्डन जंक्शन ते साऊथ मेन रोड या दरम्यान गल्ली क्रमांक २ व गल्ली क्रमांक ३ या दोन्ही रस्त्यांवर वाहनांना बंदी राहील. गल्ली क्रमांक ४ येथील पुनावाला बंगला जंक्शन ते साऊथ मेन रोड या रस्त्यावर वाहनांना बंदी राहील. गल्ली क्रमांक नऊच्या बाजूने तसेच गल्ली क्रमांक नऊला संलग्न असलेल्या बायलेनमधून साऊथ मेन रस्त्याकडे जाण्यास बंदी राहील. बालेवाडी भागात म्हाळुंगे वाय जंक्शन (ऑर्चिड हॉटेल) ते म्हळुंगे गाव जंक्शन या मार्गावरून जाण्यास वाहनांना बंदी.
पार्किंगला बंदी असणारे रस्ते
साऊथ मेन रोड पूर्व जंक्शन ते पश्चिम जंक्शन दरम्यानचा भाग. गल्ली क्र. २ व ३ साऊथ मेन रोड जंक्शन ते नाला गार्डन जंक्शन दरम्यान दोन्ही रस्त्यावर. गल्ली क्र. ४ साऊथ मेन जंक्शन ते पूनावाला बंगला जंक्शन (कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता). साऊथ मेन रोड जंक्शन ते गल्ली क्र. ९ दरम्यान गल्ली क्र. ५ व ६ मधील भागात.
 पर्यायी रस्त्यांची व्यवस्था
ब्ल्यू डायमंड चौक ते सेंट मीरा कॉलेज व साऊथ मेन रोड पश्चिम बाजू ते गल्ली क्र. १ जंक्शन व पुढे गल्ली क्र. १ मधून नॉर्थ मेन रोडकडे जाता येईल. साऊथ मेन रोड जंक्शन ते साधु वासवानी पुलाखालून नेलर रस्त्याने मंगलदास रस्त्याकडे वाहनांना जाण्यास मुभा राहील. बालेवाडी भागात ऑर्चिड वाय जंक्शन येथून सव्र्हिस रस्त्याने जिल्हा परिषद शाळामार्गे म्हाळुंगे गावाकडे जाण्या-येण्यास मुभा राहील.
वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था
साऊथ मेन रोड जंक्शन पश्चिम बाजूपासून नेलर रोड ते मंगलदास रोड या परिसरात रस्त्याच्या पूर्व बाजूस. ब्ल्यू डायमंड चौक ते सेंट मेरी कॉलेज व साऊथ मेन रोड जंक्शन या रस्त्याच्या पूर्व बाजूस. गल्ली क्र. ४ पुनावाला बंगला जंक्शन ते कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन व गल्ली क्र. चारच्या अर्धवर्तुळाकार मार्गावर एका बाजूने. मंगलदास रस्त्यावर दोन्ही बाजूना समांतर पार्किंग. आदिवासी विकास व संशोधन संस्था, साधू वासवानी पूल ते बंडगार्डन वाहतूक विभागाच्या दरम्यान. माचवे स्कूल (नॉर्थ मेन रोड) व रोही व्हिला मंगल कार्यालय (लेन क्र. ७) येथे मतमोजणीचे सरकारी कर्मचारी व वेगवेगळ्या पक्षांच्या समर्थकांसाठी पार्किंगची व्यवस्था राहील.
बालेवाडीत पक्षनिहाय पार्किंग व्यवस्था
बालेवाडी येथे वाहतूक पोलिसांच्या वतीने चक्क पक्षनिहाय पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या समर्थकांसाठी पुराणिक पार्किंग या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांसाठी विटस् हॉटेल पार्किंग या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना व भाजपच्या समर्थकांसाठी क्रीडा संकुलात हॉलिडे ईन हॉटेलजवळील पार्किंगच्या जागेवर व्यवस्था करण्यात आली आहे. मनसे, आम आदमी पक्ष व इतर पक्षांच्या समर्थकांसाठी पुराणिक पार्किंग येथे वाहने लावण्याची व्यवस्था केली आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2014 3:13 am

Web Title: traffic election counting suggestion police
टॅग : Counting,Election
Next Stories
1 विजयोत्सवाची जय्यत तयारी; मोदींच्या फ्लेक्सची छपाई सुरू
2 वीज कंपन्यांवर अंकुश ठेवणारी नवी ‘एसओपी’ चार वर्षांपासून गायब
3 निकालाच्या दिवशी विजयी मिरवणुकांना बंदी
Just Now!
X