25 February 2021

News Flash

संततधार पावसामुळे संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी

घोले रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी वर्तुळाकार वाहतूक योजना सुरू केली.

अनेक चौकांत पोलीस नसल्याने वाहतूक विस्कळीत

पुणे : संततधार पावसामुळे शहरातील वाहतूक सोमवारी कोलमडून पडली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर कोंडी झाली. अनेक चौकांत वाहतूक पोलीस नसल्यामुळे बेशिस्त वाहनचालकांनी वाहने पुढे दामटल्याने कोंडीत भर पडली.

सोमवारी सकाळपासून शहरात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडत होत्या. सकाळी दहानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर कोंडी होण्यास सुरुवात झाली. मध्यभागातील छोटय़ा रस्त्यांसह गल्ली-बोळांत कोंडी झाली. कर्वे रस्ता, डेक्कन, आपटे रस्ता, घोले रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, फग्र्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, नेहरू रस्ता, बंडगार्डन रस्त्यावर कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. संततधार पाऊस तसेच मोठय़ा संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडली.

पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.

डेक्कन भागातील आपटे रस्ता, घोले रस्ता परिसरात कोंडी झाली होती. घोले रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी वर्तुळाकार वाहतूक योजना सुरू केली. वर्तुळाकार वाहतुकीचे नियम तोडून अनेक  बेशिस्त वाहनचालक वाहने पुढे नेत असल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच या भागातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलीस नसल्याने अनेक वाहनचालक  कोंडीत अडकून पडले होते, अशी माहिती या भागातील रहिवाशांनी दिली. बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे कारवाई करण्यास सुरुवात केल्याने प्रमुख चौकात वाहतुकीचे नियोजन करण्यास पोलीस उपस्थित नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

पुण्यात रात्री जोरदार सरी

पुणे शहर आणि परिसरामध्ये सोमवारी (१ जुलै) दिवसभर पावसाच्या काही सरी बरसल्या असल्या तरी रात्री साडेआठनंतर उशिरापर्यंत जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. काही भागात रात्री वीजही गायब झाली होती. मंगळवारीही (२ जुलै) शहरात चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाभर मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 5:05 am

Web Title: traffic in entire pune city due to heavy rains zws 70
Next Stories
1 कोंढवा दुर्घटनाप्रकरणी आठ दिवसांत अहवाल तयार होणार
2 पुण्याच्या नेहा नारखेडे यांचा ‘फोर्ब्स’च्या यादीत समावेश
3 पुण्यात पावसाने जूनची सरासरी ओलांडली
Just Now!
X