27 November 2020

News Flash

वीक एंडला वाहतुकीचा खोळंबा; मुंबई- पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा

पुणे- सातारा महामार्गावरही वाहतूक कोंडी झाल्याचे वृत्त आहे

(संग्रहीत छायाचित्र )

सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने अनेकांनी पर्यटनासाठी मुंबईबाहेर धाव घेतली असून यामुळे मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. सकाळी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर वाहतूक कोंडी कमी होत गेली. तर पुणे- सातारा मार्गावरही वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असून  शनिवार आणि रविवारी देखील कार्यालयांना सुट्टी आहे. या लाँग वीक एंडचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी मुंबईबाहेर धाव घेतली. यामुळे मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे. शेडूंग टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर मुंबई- एक्स्प्रेस वेवरदेखील वाहतूक कोंडी झाल्याचे समजते. पुण्याकडे जाण्याकडे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खालापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी झाली होती. पुणे- सातारा महामार्गावरही वाहतूक कोंडी झाल्याचे वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 1:16 pm

Web Title: traffic jam on old mumbai pune highway due to long week end
Next Stories
1 शाळांसाठीचा निधी अखर्चित?
2 पिंपरीच्या बालेकिल्ल्यासाठी भाजपची व्यूहरचना
3 उजनीमध्ये रोहित पक्ष्यांचे आगमन, मात्र संख्या कमी
Just Now!
X