18 October 2018

News Flash

शहरातील २८ भागांत बेलगाम वाहनचालकांना ‘वेसण’

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. वा

नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होत असलेल्या भागांवर पोलिसांची नजर

वाहतुकीचे नियम मोडण्यात पुणेकर वाहनचालक आघाडीवर आहेत. किंबहुना वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी असतात, असा समज करून अनेक बेलगाम वाहनचालक सर्रास नियम धुडकवतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होत असलेल्या शहारतील २८ भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हे भाग ‘नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले असून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये जागृती करण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी मोहीम राबविण्यात येते. मात्र, पुणे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण मोठे आहे. वाहतूक पोलिसांकडून काही भागांचा अभ्यास करण्यात आला असून ज्या भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे, त्या भागातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ते भाग वाहतूक नियमभंगविरहित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील २८ भागांत प्रायोगिक तत्त्वावर ‘नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन

जेधे चौक ते स. प. महाविद्यालय चौक, गाडगीळ पुतळा चौक ते बुधवार चौक, सेवासदन चौक ते टिळक चौक (अलका चित्रपटगृह चौक), नळस्टॉप चौक ते करिष्मा सोसायटी चौक, नवले पूल ते वडगाव बुद्रुक पूल, तुकाराम पादुका चौक ते फर्ग्युसन  रस्ता, गोखले स्मारक चौक, वेधशाळा चौक ते गाडगीळ चौक, व्होल्गा चौक ते मार्केट यार्ड चौक, पुष्पमंगल चौक ते चंद्रलोक सोसायटी चौक, सावरकर पुतळा चौक ते दांडेकर पूल चौक, भारती विद्यापीठ मागील बाजूचे प्रवेशद्वार ते त्रिमूर्ती चौक, पॉवर हाउस चौक ते रामोशी गेट चौक, ट्रायलक चौक ते डॉ. आंबेडकर पुतळा चौक, आयबी चौक ते ब्ल्यू नाइल चौक, कोरेगाव पार्क ते एबीसी फार्म चौक, बाणेर फाटा चौक ते विद्यापीठ चौक, जगताप चौक ते कोकणे चौक, पिंपरी चौक ते शगून चौक, हॅरीस पूल ते फुगेवाडी चौक, बिजलीनगर चौक ते वाल्हेकरवाडी चौक, संभाजी चौक ते काचघर चौक, हिंजवडी टी जंक्शन ते शिवाजी चौक.

वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे

पोलिसांकडून शहराच्या प्रत्येक विभागातील एक भाग निवडण्यात आला आहे. या भागात वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेसाठी सहकार्य करावे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केली आहे.

First Published on December 7, 2017 3:43 am

Web Title: traffic police action rash drivers pune traffic police