मागील काही वर्षांपासून तृतीयपंथी हा घटक समाजापासून दूर राहिलेला होता. त्या पार्श्वभूमीवर या तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी याच तृतीयपंथीयामधील उच्चशिक्षित चांदणी गोरे यांची पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या बाबतचे नियुक्त पत्र चांदणी गोरे यांना खासदार वंदना चव्हाण आणि महिला आघाडीच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे हे देखील उपस्थिती होते.
नियुक्त झाल्यानंतर चांदणी गोरे म्हणाल्या की, तृतीयपंथी समाजातील व्यक्तीना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडविल्या जाणार आहेत. तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 1, 2019 5:06 pm