20 September 2020

News Flash

तळेगावमधील वृक्षतोडीविरोधात पाच हजार नागरिकांचा लढा

तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौक ते स्टेशन चौक या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वनराईतील ९७ वृक्षतोडी विरुद्ध तळेगावातील पाच हजार नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत.

| June 23, 2015 03:03 am

तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौक ते स्टेशन चौक या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वनराईतील ९७  वृक्षतोडी विरुद्ध तळेगावातील पाच हजार नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत.  ही झाडे तोडण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेने वृक्ष प्राधीकरणाकडे अर्ज केला आहे.
ही वनराई वाचविण्यासाठी तळेगाव क्षेत्रातील विविध सामाजिक संघटना आणि नागरिक गेले काही दिवस लढा देत आहेत. वृक्षतोडीसंबंधी माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकार कायदा २००५ या कायद्याच्या अंतर्गत विविध अर्ज केले आहेत. परंतु माहिती देण्यासाठी वृक्ष अधिकारी व उद्यान पर्यवेक्षक जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत, अशी माहिती मावळ पर्यावरण संवर्धन संस्थेचे कार्यकर्ते संदीप संघवी यांनी दिली. तसेच, उद्यान पर्यवेक्षक अधिकारी विशाल भिंड यांच्या कार्यालयात भेटीला गेले असताना भिंड यांनी ‘माझ्याविरुद्ध २९ एप्रिल रोजी तक्रार का केली’ असे म्हणून शिवीगाळ केली आणि ‘सरकारी कामात अडथळा आणले बाबत खटला दाखल करण्यात येईल’ अशी धमकी दिल्याचेही संघवी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 3:03 am

Web Title: tree cut agitation vanrai
टॅग Cut
Next Stories
1 दरड कोसळल्याने द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद
2 पृथ्वीराज चव्हाण खोटारडे – अजित पवार यांचा पलटवार
3 ‘महेश लांडगेचे योग्य वेळी पाहू’ – अजित पवार
Just Now!
X