21 September 2020

News Flash

दुधसागर धबधब्याजवळ ट्रेकिंगला गेलेल्या पुण्यातील युवतीचा मृत्यू

गोव्यातील दुधसागर धबधब्याजवळ ट्रेकिंगसाठी गेलेली पुण्यातील एका युवतीचा दोरीवरून नदी ओलांडताना पडल्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

| September 1, 2014 03:10 am

गोव्यातील दुधसागर धबधब्याजवळ ट्रेकिंगसाठी गेलेली पुण्यातील एका युवतीचा दोरीवरून नदी ओलांडताना पडल्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
चैताली पाटील (वय २४, रा. एरंडवणा, कोथरूड) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. ही युवती पुण्यातील एका ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात काम करीत होती. याबाबत उत्तर गोव्यातील कोल्लम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाण्याचे निरीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले, की पुण्यातील ३१ जणांचा गट गोव्यातील दुधसागर धबधबा येथे ट्रेकिंगसाठी आला होता. सकाळी दहाच्या सुमारास हे सर्व जण धबधब्याजवळ असलेली नदी दोरीवरून ओलांडत होते. चैताली ही दोरीवरून नदी ओलांडत असताना पाय घसरून नदीत पडली. त्या वेळी तिच्या भावाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेल्यांनी तिला तत्काळ नदीतून बाहेर काढले. तिला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न केला आणि तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, घटनास्थळापासून रुग्णालयात पोहोचण्यात बराच वेळ लागला. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू घोषित केले. तिचा मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो सोमवारी नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 3:10 am

Web Title: trekking dudhsagar falls death
टॅग Death,Trekking
Next Stories
1 पिंपरीच्या महापौरपदासाठी १२ सप्टेंबरला निवडणूक
2 कोकणात आज, उद्या अतिवृष्टी?
3 स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी समान नागरी कायदा आवश्यक- न्यायमूर्ती सावंत
Just Now!
X