पुणे सोलापूर महामार्गावरील ऊरळी-कांचन येथे दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघतात ११ जण जखमी झाले. हा अपघात आज (मंगळवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खेडेकर मळा येथे झाला. वाळू वाहतूक करणारा ट्रक आणि टायरची वाहतूक करणारा ट्रक यांच्यात ही धडक झाली. जखमींपैकी चौघे गंभीर आहेत. जखमींवर इंदापूर आणि लोणी-काळभोर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही जण इंदापूर आणि उमरगा परिसरातील असल्याचे सांगण्यात येते.