25 April 2019

News Flash

शिवनेरीवरुन शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवप्रेमीवर काळाचा घाला

वाईमधील पाचपुतेवाडी येथील शिवजयंती उत्सवासाठी शिवज्योत घेऊन काही शिवप्रेमी दुचाकीवरुन शिवनेरी येथून निघाले होते. चाकण येथे शिवज्योतमध्ये तेल घालण्यासाठी ते थांबले होते.

वाईमधील पाचपुतेवाडी येथील शिवजयंती उत्सवासाठी शिवज्योत घेऊन काही शिवप्रेमी दुचाकीवरुन शिवनेरी येथून निघाले होते.

शिवनेरीवरुन शिवज्योत घेऊन निघालेल्या एका शिवप्रेमीचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पुणे- नाशिक महामार्गावर घडली. या अपघातात दोन शिवप्रेमी गंभीर जखमी झाले आहेत. स्वप्नील अरविंद चव्हाण (वय २४) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून अमर पाचपुते आणि विनायक चव्हाण अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

वाईमधील पाचपुतेवाडी येथील शिवजयंती उत्सवासाठी शिवज्योत घेऊन काही शिवप्रेमी दुचाकीवरुन शिवनेरी येथून निघाले होते. चाकण येथे शिवज्योतमध्ये तेल घालण्यासाठी स्वप्नील, अमर आणि विनायक थांबले होते. तेव्हा मागून आलेल्या ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. यात शिवप्रेमी स्वप्नील अरविंद चव्हाण याचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर अमर आणि विनायक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस स्थानकात पहाटे ट्रक चालकावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on April 17, 2018 4:39 pm

Web Title: truck hits bike in chakan one killed 2 injured