मुलगा आणि सुनेच्या छळाला कंटाळून ज्येष्ठ महिलेने महानगरपालिकेजवळील शिवाजी पुलावरून मुठा नदीत रविवारी दुपारी चारच्या सुमारास उडी घेतली. मात्र, नदीत पोहणाऱ्या दोन तरुणांनी या महिलेला वेळीच बाहेर काढल्यामुळे तिला वाचविण्यात यश आले आहे.
सुखसागरनगर येथील ७५ वर्षीय ज्येष्ठ महिला पीएमपी बसने मनपा येथे आली. शिवाजीपुलावर जाऊन त्या महिलेने दुपारी चारच्या सुमारास मुठा नदीत उडी घेतली. यावेळी नदीत पोहोत असलेले श्रावण पाठक व राजेश काची यांनी या ज्येष्ठ महिलेला बाहेर काढले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश सरतापे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या महिलेला उपचारासाठी पाठवून देण्यात आले आहे. या महिलेने सून व मुलाच्या छळास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 2:46 am