यंदा किनारी खाद्यसंस्कृतीची ओळख; मृणाल कुलकर्णी, पराग कान्हेरे यांची उपस्थिती

सागर किनारा लाभलेल्या पूर्व आणि पश्चिम क्षेत्रांत वसलेल्या देशभरातील राज्यांनी उपलब्ध सागरी संपत्तीचा वापर करून वैशिष्टय़पूर्ण खाद्यसंस्कृती विकसित केली. या  आहाराचा मंत्र सांगणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकात यंदा किनारीक्षेत्रांमधील समृद्ध पाककृतींची ओळख करून देण्यात आली आहे. या खास अंकाचे प्रकाशन मंगळवारी (२७ ऑगस्ट) एका आगळ्या कार्यक्रमात होईल.

कुटुंबातील प्रत्येकासाठी पौष्टिक आहारसूत्रे आखून देणारा ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ हा वार्षिकांक गेल्या पाच वर्षांत वाचकप्रिय बनला आहे. किनारा म्हटला, की तेथील आहार विविध प्रकारच्या मासळीने समृद्ध तसेच भात आणि नारळ हे घटकही व्यंजनांत महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक या पदार्थाची खासियत मात्र वेगवेगळी असते. हीच खासियत या विशेषांकात वाचायला मिळणार आहे. नऊ  राज्यांतील खाद्यसंस्कृतीची उत्तम जाण असणाऱ्या लेखिकांनी एकेका राज्यातील महत्त्वाच्या पदार्थाचा परिचय करून दिला आहे.

खास आकर्षण..

* अंकात गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि प. बंगाल या राज्यांच्या खाद्यसंस्कृतीत काय दडले आहे, याची माहिती.

*  अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि पराग कान्हेरे यांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा प्रकाशन सोहळा आणि पाककला स्पर्धा.

रुचकर स्पर्धेचे आयोजन

लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या प्रकाशनानिमित्त वाचक खवय्यांसाठी एका रुचकर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंपाकघरात नवनवीन खमंग प्रयोग करणारे सर्व स्त्री-पुरुष या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेचा अधिक तपशील शनिवारच्या अंकात.

* प्रायोजक – तन्वी हर्बल

*  सहप्रायोजक – श्री धूतपापेश्वर

*  बँकिंग पार्टनर – अपना बँक

*  पॉवर्ड बाय- किंजीन फूड्स प्रा. लि., के. के. ट्रॅव्हल्स, आनंद कुमार जीवन मार्गदर्शन

*  हेल्थकेअर पार्टनर- होरायझन हॉस्पिटल

प्रकाशन सोहळा

केव्हा

२७ ऑगस्ट

कधी

सायंकाळी ६.००

कुठे

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर शाळेचे सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड