News Flash

तुकाराम मुंढेंची पुणे परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

सरकारच्या धोरणाशी घेतलेला आक्रमक विरोधी पवित्रा महागात पडला होता.

Tukaram Mundhe : सुरूवातीला पीएमपीच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब मिसाळ यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी पुण्यातील बदलीला नकार दिल्यामुळे आता याठिकाणी तुकाराम मुंढेंची वर्णी लागली आहे.

नवी मुंबईचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची शनिवारी पुणे परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी (पीएमपी) नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले. तुकाराम मुंढे यांची शुक्रवारी नवी मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. मुंढे यांच्या जागी मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील भूमाफिया, नियम वाकविण्यात वाकबगार असलेले बिल्डर, राजकीय नेते, ठेकेदार आणि महापालिकेतील ठराविक अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीला धडाकेबाज कामगिरीने गेले वर्षभर सळो की पळो करुन सोडणारे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे Tukaram Mundhe यांना अनधिकृत बांधकामाबाबत सरकारच्या धोरणाशी घेतलेला आक्रमक विरोधी पवित्रा महागात पडला आहे. अवैध बांधकामाना संरक्षण देण्यास नाकारणाऱ्या  मुंढे यांच्या भूमिकेला उच्च न्यायालयाने गौरविल्याच्या घटनेला २४ तास उलटायच्या आत सरकाने शुक्रवारी त्यांची महापालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती.

पीएमपीचे माजी अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांची नऊ महिन्यांपूर्वी नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून पीएमपीच्या अध्यक्षपदाचा प्रभारी कारभार पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. सुरूवातीला पीएमपीच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब मिसाळ यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी पुण्यातील बदलीला नकार दिल्यामुळे आता याठिकाणी तुकाराम मुंढेंची वर्णी लागली आहे. तुकाराम मुंढेंची नवी मुंबईतील कारकीर्द पाहता याठिकाणीही ते आपली छाप काढणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. यापूर्वी श्रीकर परदेशी पीएमपीचे अध्यक्ष झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी मंडळाच्या कारभारात आमुलाग्र बदल केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 2:46 pm

Web Title: tukaram mundhe appointed as pune pmp chairman
Next Stories
1 ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळ्याचा आरोप; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
2 पुण्याच्या आयुक्तांना कचरावेचक महिलांकडून जुन्या शर्टांची भेट
3 मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा
Just Now!
X