News Flash

नगरसेवकाच्या ‘त्या’ प्रश्नावर तुकाराम मुढेंचे स्मितहास्य !

पीएमपीएमएलच्या आढावा बैठकीतील प्रकार

पीएमपीएमएल अध्यक्ष तुकाराम मुंढे (संग्रहित छायाचित्र)

पुणे पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढें आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील मतभेद अनेकदा सर्वांसमोर आले आहेत. बुधवारी पीएमपीएमएलच्या खास बैठकीत नगरसेवकांनी एकत्रितपणे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सूर आळवल्याचे पाहायला मिळाले.

पीएमपीएमएलची आढावा बैठक आज महापालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पीएमपीएमएलचे अधिकारी कोण? त्यांनी आपली ओळख करुन द्यावी, अशी मागणी केली. सभागृहातील सर्व नगरसेवकांनी बाक वाजून या मागणीचे समर्थन केले. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्मितहास्य करत ‘मी तुकाराम मुंढे’ असे उत्तर देत पीएमपीएमएलच्या सध्य परिस्थितीचा आढावा देण्यास सुरुवात केली.

यंदाच्या महापालिका निवडणुकीनंतर विषय समितीच्या नियुक्तीवेळी मुंढे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कार्यभार पाहिला होता. त्यावेळी मुंढे यांनी नगरसेवकाकडे त्यांचे ओळखपत्र मागितले होते. यावेळी तुम्हीच तुकाराम मुंढे कशावरून असा प्रतिसवाल नगरसेवकांनी विचारला होता. याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 1:24 pm

Web Title: tukaram mundhe smile after corporator question who is pmpml chairman
Next Stories
1 आईच्या हातून गंभीर चूक, ११ दिवसांचे बाळ ८५ टक्के भाजले
2 राज्यघटनेच्या मूल्यांना सुरूंग लावण्याच्या प्रयत्नांची भीती- पृथ्वीराज चव्हाण
3 फग्र्युसन रस्ताही वाहतूक कोंडीचा?
Just Now!
X