16 December 2019

News Flash

तुर्कस्तानातील कांदा बाजारात!

अफगाणिस्तान, इजिप्तच्या कांद्यापेक्षा तुर्कस्थानातील कांद्याचा दर्जा चांगला आहे

(संग्रहित छायाचित्र)

कांद्याच्या भाववाढीमुळे सामान्यांच्या डोळ्यात पाणी आले असतानाच आता दरनियंत्रणासाठी राज्यात तुर्कस्तानातून कांदा दाखल झाला आहे.

मुंबईत हा कांदा दाखल झाल्यानंतर तेथून पुण्याच्या गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी तुर्कस्तानातून एक लाख किलो कांद्याची आवक झाली. या कांद्याची प्रतवारी महाराष्ट्रातील कांद्याप्रमाणेच आहे. अफगाणिस्तान, इजिप्त येथील कांद्यापेक्षा तुर्की कांद्याला उच्चांकी ८० रुपये किलोचा भाव मिळाला आहे. आतापर्यंत परदेशातून आयात करण्यात आलेल्या कांद्यापैकी तुर्कस्तानातील कांदा दर्जेदार असल्याने ग्राहकांनी या कांद्याला पसंती दिली आहे. या कांद्याला उच्चांकी भाव मिळाला असल्याची माहिती मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. तुर्क स्तानातील कांदा मुंबईत दाखल झाला. तेथून रविवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात चार कंटेनर कांदा विक्रीसाठी दाखल झाला. प्रत्येक कंटेनरमध्ये २५ ते ३० टन कांदा आहे. त्यापैकी दोन ते तीन कंटेनर कांद्याची रविवारी विक्री झाली, असे त्यांनी सांगितले.

तुर्की कांद्याला उच्चांकी भाव

अफगाणिस्तान, इजिप्तच्या कांद्यापेक्षा तुर्कस्थानातील कांद्याचा दर्जा चांगला आहे. तुर्की कांदा महाराष्ट्रातील कांद्याप्रमाणे भरीव असून रंगाने पिवळसर आहे. इजिप्तचा कांदा पोकळ असल्याने त्याला ग्राहकांकडून फारशी मागणी नव्हती. त्या तुलनेत तुर्की कांद्याला चांगली मागणी आहे. परदेशातून आयात करण्यात आलेल्या कांद्यापैकी तुर्की कांद्याला प्रतिकिलो ८० रुपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे.

किरकोळ बाजारात भाव १२० रुपयांवर

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव वाढत आहेत. किरकोळ बाजारात जुन्या कांद्याची विक्री १०० ते १२० रुपये या भावाने केली जात आहे, असे रितेश पोमण यांनी सांगितले. कांद्याचे भाव वाढल्याने कांदा उत्पादक शेतक ऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी सामान्यांच्या डोळ्यात भाववाढीमुळे पाणी आले. परदेशातून कांदा आयात करण्यास शेतक ऱ्यांनी विरोध केला होता. नवीन कांद्याची मोठी आवक होत नसल्याने जुन्या कांद्याचा साठा संपत आला आहे. तुर्कस्तानातील कांद्यामुळे साठा वाढविण्याची शक्यता आहे.

First Published on December 2, 2019 12:51 am

Web Title: turkestan onion in market abn 97
Just Now!
X