खर्चामध्ये नागपूर आणि सोलापूर विद्यापीठ सर्वाधिक सुस्त
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळालेल्या निधीचा वापरच न केल्यामुळे राज्यातील विद्यापीठांचा कोटय़वधी रुपयांचा निधी पडून राहिला असल्याचे आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर येत आहे. बहुतेक विद्यापीठांनी आतापर्यंत पन्नास ते साठ टक्केच निधी खर्च केला असून नागपूर आणि सोलापूर विद्यापीठांनी जेमतेम १० टक्के निधीचा वापर केला आहे.
एकीकडे विद्यापीठांच्या विकासासाठी निधी कमी पडतो. आर्थिक तरतुदी पुरेशा नसल्यामुळे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत अशी ओरड करणाऱ्या राज्यातील विद्यापीठांना निधी मिळूनही तो पडून असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेत विद्यापीठांना कोटय़वधी रुपयांचा निधी आयोगाने दिला आहे.
विकास, नवे अभ्यासक्रम, पायाभूत सुविधांची उभारणी यांसाठी हा निधी खर्च करणे अपेक्षित आहे. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, यांनी आयोगाकडून मिळालेल्या निधीपैकी पन्नास टक्के निधीही खर्च केलेला नाही. राज्यात सर्वाधिक म्हणजे ३३ कोटी ३१ लाख रुपये निधी मुंबई विद्यापीठासाठी मंजूर झाला आहे. गेल्या चार वर्षांमध्ये त्यातील १३ कोटी रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत. मात्र विद्यापीठाने केलेल्या खर्चाचे तपशील आयोगाकडे अद्यापही उपलब्ध नाहीत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला २६ कोटी ८० लाख रुपये मंजूर केल्याचे दिसत आहे. त्यातील साधारण १० कोटी रुपये विद्यापीठाला अद्याप मिळाले असून त्यातील ९० टक्के निधी विद्यापीठाने खर्च केला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ, नागपूर यांनी मात्र मिळालेल्या निधीचा शंभर टक्के वापर केला आहे.

विद्यापीठांची घाई
योजनेची सुरुवात २०१२ मध्ये झाली. ही योजना २०१७ पर्यंत लागू होणार आहे.गेल्या चार वर्षांमध्ये विद्यापीठांना मिळालेला निधी पडून असल्याचे समोर येत आहे. या योजनेचे हे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांंत मिळालेला निधी एकाच वर्षांत खर्च केल्याचे दाखवण्याची घाई विद्यापीठांना करावी लागणार आहे.

ugc marathi news, ugc academic year marathi news
शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार? युजीसीने दिल्या सूचना…
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

अभिमत विद्यापीठे आघाडीवर
शासकीय विद्यापीठांचा निधी पडून असताना राज्यातील अभिमत विद्यापीठे मात्र निधी खर्च करण्यात आघाडीवर आहेत. पुण्यातील डेक्कन कॉलेज, गोखले इन्स्टिटय़ूट, मुंबईतील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स आणि इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या चार विद्यापीठांना बाराव्या पंचवार्षिक योजनेत निधी मंजूर झाला होता. या चारही विद्यापीठांनी प्रत्येक वर्षी शंभर टक्के निधीचा उपयोग केला आहे. एकूण मंजूर निधीपैकी साधारण ८० टक्के निधी या विद्यापीठांनी वापरला आहे.