बारावीच्या परीक्षेत राज्यात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ८४.०६ टक्के तर मुलांचे प्रमाण ७६.६२ इतके आहे. एकूण ७९.९५ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आला. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ८५.८८ टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९१.३० टक्के, वाणिज्य शाखेचा ७४.८६ टक्के आणि कला शाखेचा ७०.९२ टक्के इतका लागला आहे. कौशल्यावर आधारित एमसीव्हीसीचा निकाल ८९.९५ टक्के इतका आहे. विद्यार्थ्यांना सहा जून रोजी त्यांची गुणपत्रिका मिळणार आहे.
विभागवार निकाल खालीलप्रमाणे टक्केवारीमध्ये
पुणे – ८१.९१
मुंबई – ७६.८१
नागपूर – ७३.१०
कोल्हापूर – ८४.१४
अमरावती – ८२.९१
लातूर – ८३.५४
औरंगाबाद – ८५.२६