दोघा ट्रक मालकांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक

पुणे : वाळूचा ट्रक सोडून देण्यात यावा, यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांना 50 हजार 1 रूपयांची लाच गुगल पे द्वारे दिल्या प्रकरणी, दोघा ट्रक मालकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.

दत्तात्रय हिरामण पिंगळे वय 33 रा.दौंड आणि अमित नवनाथ कांदे वय 29 रा. मांजरी असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नाव आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रोडवरील शेवाळवाडी फाटा येथे MH 16 T 4100 या क्रमांकाचा वाळूचा ट्रक हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांना दिसला. तो ट्रक बाजूला घेण्यास सांगितल्यावर,ट्रक चालकांने ट्रक बाजूला घेतल्यावर,तेथून चालकांन पळ काढला.त्यानंतर काही वेळाने ट्रकचा मालक घटनास्थळावर आला. तिथे तहसीलदार यांना पैशाचे आमिष दाखवले.त्यावर तहसीलदार यांनी पैसे घेण्यास नकार दिला.त्यानंतर तहसीलदार तृप्ती कोलते, या पुढील कामासाठी गेल्यावर त्यांना फोन आला.त्यावर समोरच्या व्यक्तिने सांगितले की, बँक खात्याची माहिती मागितली.तुमच्या खात्यात पैसे जमा करायचे आहे.असे त्यांना सांगितले.त्यावर आरोपी दत्तात्रय हिरामण पिंगळे आणि अमित नवनाथ कांदे या दोघांनी तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या मोबाईलवरील ‘गुगल पे’ वर सुरुवातीला 1 रुपया आणि नंतर 50 हजार अशी एकूण 50 हजार 1 रूपयांची रक्कम ट्रान्स्फर केली.ही बाब कोलते यांच्या लक्षात येताच,त्यांनी आमच्याकडे तक्रार केली असता.दत्तात्रय हिरामण पिंगळे आणि अमित नवनाथ कांदे यांनी लाच दिल्या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.