पिंपरी-चिंचवड परिसरातील दापोडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या इसमांकडून तीन किलो गांजा आणि जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल जप्त केले आहे.  भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विशाल गोरख कदम (वय-२७) आणि रोहन महादेव लिंगे( वय-२०) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सुमित दत्तात्रय देवकर आणि गोपी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एस.टी.वर्क शॉप रोड दापोडी याठिकाणी दोन इसम गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. त्यानुसार सबंधित ठिकाणी जाऊन बातमीची खात्री  केली असता दोन आरोपी आढळले. मात्र त्यांचे कडिल पांढऱ्या रंगाच्या बॅगसह पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना त्यांना पकडले, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजव ३ किलो ११० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. एवढंच नाही तर विशाल गोरख कदम याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूसही मिळाले. आरोपींवर भोसरी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.