13 October 2019

News Flash

पैशांचा पाऊस पाडतो असे सांगत मांडूळ विक्री करणारे दोघे अटकेत

पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली

घरात पैशांचा पाऊस पाडतो असे सांगत मांडूळ विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. पिंपरीत ही घटना घडली असून पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या दोघांकडून पाच लाख रुपये किंमत असलेला मांडूळ जातीचा सापही जप्त केला आहे. हेमंत संजू पवार आणि आकाश वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पवार आणि आकाश वाघमारे हे दोघे मांडूळ विकणार असून ते ग्राहकाच्या शोधात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी या आरोपींना अटक करायचे ठरवले. पोलीस शिपाई मालुसरे यांनी या दोघांशी ग्राहक म्हणून संपर्क साधला. चार लाख रुपयांमध्ये मांडुळाचा व्यवहार ठरला. मालुसरे यांना या दोघांना नाशिक-पुणे महामार्गावरच्या मोशी या ठिकाणी बोलावले. ठरल्यानुसार मालुसरे ग्राहक बनून या दोघांना भेटण्यासाठी गेले. तिथे हे दोघे येताच सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली.

First Published on January 11, 2019 5:30 pm

Web Title: two arrested for mandul snake smuggling in pimpri