19 October 2019

News Flash

माजी महापौर राजपाल यांच्या मुलासह दोघांना अटक

पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या मुलासह दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २९ डिसेंबपर्यंत पोलीस

| December 27, 2014 02:20 am

पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या मुलासह दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बच्चनसिंग मोहनसिंग राजपाल (वय ३४) आणि प्रसाद वसंत मदीकंठ (वय ३९, रा. दोघेही- रास्ता पेठ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी राम धर्मा डंबाळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपाल याने डंबाळे यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात फसवणुकीची समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीतील पैशाचा व्यवहार डंबाळे यांनी मिटवून दिला नाही. यातील व्यक्तींना पाठीशी घालत असल्याचा राग मनात धरून राजपाल याने डंबाळे यांना ससून कॉर्टरच्या मागे पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची दिली, अशी तक्रारातील म्हटले आहे. याप्रकरणई दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयाने २९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

First Published on December 27, 2014 2:20 am

Web Title: two arrested include former mayor mohansingh rajpal son