26 January 2020

News Flash

पुणे : तलावात पोहण्यास गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

बुडालेली दोन्ही मुले अल्पवयीन आहेत, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

पुण्यातील कात्रज येथील भिलारेवाडी तलावात पोहण्यास गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चार तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशामन दलाच्या जवानांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

अग्निशमन अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, विवेक दिपक कदम (वय १५) आणि तुषार शांताराम भांबरे (वय १६) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. कात्रज येथील भिलारेवाडी तलावात विवेक आणि तुषार हे दोघे आज दुपारच्या सुमारास पोहण्यास गेले होते. त्यावेळी दोघे तलावात बुडाले.

या घटनेची माहिती पोलिस आणि अग्नीशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मुलांना तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले आणि तत्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच दोघांना मृत घोषीत केले.

First Published on August 13, 2019 9:40 pm

Web Title: two children drown in lake at katraj pune aau 85
Next Stories
1 वडापाव विकून एक दिवसाचं उत्पन्न पूरग्रस्तांना, विक्रेत्याचं स्तुत्य पाऊल
2 पुणे – डीएस कुलकर्णींच्या भावाचा देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून अटक
3 पाण्यासाठी भाजपा नगरसेविकेचे टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन
Just Now!
X