03 August 2020

News Flash

दोन दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस

संग्रहित छायाचित्र

राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकू ल वातावरण तयार झाले आहे. दक्षिण कोकणात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाच्या दीर्घकालीन विस्तारित पूर्वानुमानानुसार दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, नंतरच्या दोन आठवडय़ांत मराठवाडय़ात काही प्रमाणात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. मात्र, इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे.

दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर के रळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गेल्या २४ तासांत कोकण भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. बुधवारी संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवारी (१६ जुलै) मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात शनिवापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणात जोरदार, मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस पडू शकतो. मुंबईनंतर दोन-तीन दिवसांत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस होतो. त्यानुसार विदर्भात चालू आठवडय़ात पावसाची शक्यता आहे.

पर्जन्यभान..

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्य़ांत जोरदार पाऊस पडेल, तर गुरुवारी संपूर्ण कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:18 am

Web Title: two days of rain forecast across the state abn 97
Next Stories
1 मेट्रोच्या नावाखाली विकासकाला भूखंड?
2 लोकप्रिय युवा गायकासमवेत शब्दमैफील
3 पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाउनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद
Just Now!
X