पुण्यात एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांच्या जळीतकांडाची घटना घडली आहे. वाघोलीत सहा ट्रक तर शुक्रवार पेठेत सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

वाघोली येथील उबाळेनगर परिसरात बाबूभाई गॅरेजमध्ये सहा ट्रक आगीत जळून खाक झाले आहेत. काल मध्यरात्री अडीच तीनच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पोहचल्याने आग लगेच आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत यात दहा ट्रक जळून खाक झाली.
तर दुसरीकडे शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमोरील रात्री साडेतीनच्या सुमारास सहा दुचाकी जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.

(संग्रहित छायाचित्र)