पुण्यातील औंध डीपी रोडवरील डॉ. आंबेडकर वसाहतीमधील ओम साई गॅसच्या दुकानात सिलिंडर गळतीमुळे अपघात झाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत दुकानातील दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अग्निशामकच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध डीपी रोडवरील डॉ. आंबेडकर वसाहतीत ओम साई गॅसच्या दुकानात दुपारी बाराच्या सुमारास गॅसचा स्फोट झाला. यावेळी दुकानात दोन कामगार काम करत होते. या स्फोटात ते गंभीर भाजले असून त्यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे गॅसचे दुकान अनाधिकृतपणे चालवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवेळी ८५ छोटे आणि २० मोठे सिलिंडर दुकानात होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी औंध पोलिस अधिक तपास करत आहेत.