पुणे जिल्ह्यातील खेडमधील खरपुडी येथे जंगली तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. खेड तालुक्यातील खरपुडी गावात भर दुपारी हा प्रकार घडला. या घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यात एक जेष्ठ नागरिक आणि एक तरुण जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याचा मोबाईल कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार शूट केला आहे.

या व्हिडिओमध्ये जेष्ठ नागरिक रस्त्यावरून पायी निघालेले होते. तेव्हा लगतच्या झुडपातून अचानकपणे तरस बाहेर आला. पुढे पायी निघालेल्या वृध्दाचा हात त्याने अक्षरशः जबड्यात पकडला आला त्या जेष्ठ नागरिकाला जखमी केले. सुदैवाने एक तरुण वेळीच मदतीला धावल्याने ती व्यक्ती बचावली. तसेच तसराने दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा देखील चावा घेत जखमी केले आहे. जखमींवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यासोबत जंगली तरसाचा देखील हल्ला सुरू आहे.