News Flash

पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये दोन बिबट्यांचा नागरिकांवर हल्ला, दोन जखमी

या बिबट्यांनी गावातील ५ कुत्र्यांवर देखील हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडला. बिबट्यांच्या या हल्ल्यांमुळे दिवळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये दोन बिबट्यांचा नागरिकांवर हल्ला, दोन जखमी
संग्रहित प्रातिनिधीक छायाचित्र

भोर तालुक्यातील कापूरहोळ जवळील दिवळे गावात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन बिबट्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सुरेश जगताप आणि किरण पांगरे हे दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. ते ऐकून सुरेश जगताप आणि किरण पांगरे हे घराबाहेर आले. बाहेर आल्यानंतर अंगणात असलेल्या दोन बिबट्यांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. यात ते दोघे जखमी झाले दरम्यान, त्यांनी आरडाओरडा केल्याने आसपासच्या लोकांना जाग आली आणि त्यांनी या दोघांकडे धाव घेतली.

मात्र, गावातील लोक येईपर्यंत या बिबट्यांनी तेथून पळ काढला. या बिबट्यांनी गावातील ५ कुत्र्यांवर देखील हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडला. बिबट्यांच्या या हल्ल्यांमुळे दिवळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या गावच्या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनखात्याला दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांवर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2018 1:19 pm

Web Title: two leopards attacked on two villagers in bhor taluka treatment continue on injured
Next Stories
1 मित्रांसोबत पोहायला गेलेल्या युवकाचा पवना नदीत बुडून मृत्यू
2 रेल्वे गाडय़ांतील खाद्यपदार्थावर पाच टक्केच जीएसटी लावण्याचे आदेश
3 नगर रस्त्यावरील कोंडीवर उतारा
Just Now!
X