News Flash

बंदुकीचा धाक दाखवून सराफी दुकानात चोरी, वाघोलीतील घटना

चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात सेल्समन जखमी

पुण्यातील वाघोलीमध्ये दुपारी दोनच्या सुमारास चोर सराफी दुकानात शिरले.

वाघोली येथील बगाडे सराफी दुकानात मंगळवारी दोन अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवून चोरी केल्याची घटना घडली. दुपारी दोनच्या सुमारस ही घटना घडली. यावेळी चोरट्यांनी  केलेल्या गोळीबारात दुकानातील एक सेल्समन जखमी झाला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वाघोली येथील बगाडे सराफी  दुकानात आज दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञातांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील सर्व माल देण्यास सांगितले.

यावेळी दुकानातील महिला कामगाराने सायरन वाजवल्याने त्या दोघांनी हाती लागेल तेवढे दागिने घेऊन पळ काढला. दुकानातील एका कामगाराने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्याचावर गोळीबार करुन तेथून मोटर सायकलवरून फरार झाले. चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या कामगारावर उपचार सुरु आहेत. या घटनेत सराफी दुकानातून चोरट्यांनी १७९.२९ ग्रॅमच्या २२ सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेल्या आहेत. याची किंमत अंदाजे ५६९८२१ इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 10:17 pm

Web Title: two man thief jewelry shop in pune wagholi
Next Stories
1 पुण्यातील कचराप्रश्नी विरोधक आक्रमक; महापौर-पालकमंत्र्यावर निशाणा
2 सरकार सदाभाऊंची ढाल म्हणून वापर करते : खासदार राजू शेट्टी
3 पुण्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तृतीयपंथीयांचे अन्नत्याग आंदोलन
Just Now!
X