24 September 2020

News Flash

दोन मोबाइल चोरट्यांना पोलिसांकडून अटक

मोबाइल चोरणारे दोघे आणि इतर दरोडा प्रकरणातले दोघे अशी चौघांना अटक करण्यात आली आहे

मोबाइलच्या आकर्षणातून रस्त्यावरच्या माणसांचे मोबाइल चोरणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासोबतच इतर दोघांनाही दरोडा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मोबाइल चोरट्यांकडून एकूण 3 लाख 19 हजार रुपये किंमतीचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.

सुनील प्रकाश यादव (वय 19, रा. भोसरी), याच्यासह 15 वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. या दोघांनाही मोबाइलचे आकर्षण होते त्या आकर्षणातूनच हे दोघे मोबाइल लंपास करत असत आणि त्यांच्या मित्रांना किंवा इतर काही ठिकाणी हे मोबाइल स्वस्त किंमतीत विकत असत. मिळालेल्या पैशांमधून मौजमजा करत. आत्तापर्यंत या दोघांनी एकूण 19 मोबाइल हिसकावले. या सगळ्यांची किंमत काही लाखांच्या घरात आहे.

दरम्यान,सार्वजनिक रस्त्यावर किंवा उद्यानात मोबाईलवर बोलताना बेसावध राहू नये,तसेच निष्काळजीपणा करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी केले असून ज्यांचे मोबाइल हिसकावण्यात आले आहेत. अश्या व्यक्तींनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात संपर्क करावा अस म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 7:08 pm

Web Title: two mobile thefts arrested by pimpri police
Next Stories
1 १४ मांजरी, सात कुत्र्यांच्या हत्येची माहिती देणाऱ्याला मिळणार ५० हजार रुपये इनाम
2 पगार थकल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या
3 मराठवाडा, विदर्भात आज पावसाची शक्यता
Just Now!
X