पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आज दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल हा करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयातील एकूण करोनाबाधितांची संख्या १७वर पोहचली असून यांपैकी १३ जणांला डिस्चार्ज देण्यात आला आहे. यांपैकी काही जण कर्तव्यावर देखील रुजू झाले आहेत. दरम्यान, एकाच दिवशी दोन वरिष्ठ अधिकारी करोनाबाधित आढळल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण १७ जण करोनाबाधित आढळले आहेत. यांपैकी १३ जण कोरोनामुक्त झाले असून ते ड्युटीवर रुजू झाले आहेत. तर, चार जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधिकऱ्यांनी दिली.

bus
जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
pune lok sabha election latest marathi news, pune loksabha marathi news, pune lok sabha 2024 marathi news
पुणे : निवडणुकीतील गैरप्रकारांवर २६४ पथकांकडून देखरेख
Amravati, Land Lease Scam, 348 Crore, Supreme Court, sent Notice, Divisional Commissioner, District Collector,
अमरावतीत ३४८ कोटींचा जमीन लीज घोटाळा : सर्वोच्च न्यायालयाची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच करोनाची बाधा झाल्याने चिंत व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली असून त्यांची देखील करोना टेस्ट करण्यात येणार आहे.