News Flash

दुचाकी पाडल्याचा जाब विचारल्याने चावा घेत पाडला कानाचा तुकडा

आरोपीला निगडी पोलिसांनी केली अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकीला लाथ मारून खाली पाडल्याचा जाब विचारल्याने चक्क आरोपीने कानाला चावा घेत तुकडा पाडल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी जखमी कौतुभ गोळे यांनी निगडी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी अभिजित गुंजाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादींची इमारतीतमध्ये पार्क केलेल्या दुचाकीला अभिजीतने लाथ मारली होती. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून चावा घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौतुभ यांनी त्यांची दुचाकी राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. तेव्हा, आरोपी अभिजित हा दुचाकीला काहीतरी खोडसाळपणा करत असल्याचे फिर्यादीच्या पत्नीने पाहिले आणि पतीला माहिती दिली. त्यांनी तातडीने येऊन पाहिले असता तो खोडसाळपणा करत असल्याचे दिसले.

तसेच आरोपी अभिजितने त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडली. याचा जाब जेव्हा कौतुभ यांनी विचारला तेव्हा त्याने चक्क कानाला चावा घेत तुकडा पाडला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अभिजीतने कौतुभ आणि त्यांच्या पत्नीला लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 4:57 pm

Web Title: two wheeler ear bite pune police arested one person jud 87
Next Stories
1 पुणे पोलिसांनाच हव्यात पुणेरी पाट्या, असतील तर इथे पाठवा
2 पुणे – मुठा नदी पात्रात मगर, नागरिकांना सावधानतेचा इशारा
3 ‘एसईबीसी’साठी विद्यापीठांत आता १२ टक्के आरक्षण
Just Now!
X