सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या
शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये सासरच्या छळाला कंटाळून दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवणे आणि औंध परिसरात या घटना घडल्या.
शिवणे परिसरातील सद्गुरुनगर येथे राहणाऱ्या सारिका अविनाश गौर (वय २२) यांनी पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून गुरुवारी ( १९ मे) सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सारिका यांचे वडील पांडुरंग बावधाने (वय ७५, रा. चिपळूण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती अविनाश आणि दीर यांच्याविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक ताटे तपास करत आहेत.
दरम्यान, औंध परिसरात पुष्पा विकास काळे हिने गुरुवारी आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विकास काळे याच्याविरुद्ध चतु:श्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुष्पा यांचे भाऊ माउली क्षीरसागर यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.