पुण्यातील येरवडा भागात एका बांधकाम साइटवर फरशी अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. गोविंद मिठाई लाल प्रजापती (22, उत्तरप्रदेश) आणि लक्ष्मण रामरतन दुर्वे (26, छत्तीसगढ़) अशी या कामगारांची नावे आहेत.

येरवडा येथील बोट क्लब रस्त्यावर एका इमारतीचे काम सुरू होते. बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फरशीची ने- आण करण्याचे काम सुरु होते. यादरम्यान, गोविंद प्रजापती आणि लक्ष्मण रामरतन दुर्वे या कामगारांच्या अंगावर फरशी पडली. यात ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर या घटनेचा तपास येरवडा पोलीस करीत आहे.