पुण्यातील सिंहगड परिसरात घराबाहेर खेळत असताना, दोन वर्षाचा मुलगा नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. अद्यापपर्यंत त्या मुलाचा शोध सुरू असल्याचे अग्नीशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अग्नीशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीडवरून कामानिमित्त सूर्यकांत साबळे हे पती आणि संस्कार २ वर्षाचा मुलगा यांच्या सोबत मागील काही महिन्यापासून सिंहगड रोडवरील रक्षालेखा सोसायटीच्या परिसरात राहत होते. तर आज साडे पाच वाजण्याच्या सुमारास २ वर्षाचा संस्कार घराबाहेर खेळत होतो.

त्यावेळी काही समजण्याच्या आतमध्ये, संस्कार नाल्यामध्ये पडला. या नाल्यातील पाण्याच्या प्रवाह जोरात असल्याने, काही क्षणात दिसेनासा झाला. या नाल्यात राडा रोडा आणि आजूबाजूला झाडे पडली असल्याने शोध कार्यात अनेक अडचणी आल्या आहे. यामुळे अद्यापपर्यंत संस्कारचा शोध लागण्यास यश आले नसून उद्या सकाळी सात वाजता, पुन्हा शोध कार्यास सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.