18 October 2018

News Flash

पिंपरीतील धक्कादायक घटना; पित्याकडून अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार

नात्याला काळिमा फासणारी घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमधील सांगवीमध्ये मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम पित्याने आपल्या अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. ३० नोव्हेंबरला सायंकाळी साडेचारच्या सुमारास पत्नी बाथरुममध्ये गेल्यानंतर आरोपी पित्याने घरातच चिमुकलीवर अत्याचार केला. पीडितेची आई बाथरुममधून बाहेर आल्यानंतर मुलीसोबत घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला. मात्र, जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडितेची आईने मुलीला रुग्णालयात नेणे टाळले. या भयावह प्रकारावर तिने मौन बाळगले. परंतु, दुसऱ्या दिवशी देखील आरोपीने पत्नीला मारहाण करत मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा घडलेल्या या प्रकारानंतर अखेर पीडितेच्या आईने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी नराधम पित्यास सांगवी पोलिसांनी अटक केली.

First Published on December 7, 2017 12:25 pm

Web Title: two year old girl raped by own father in pimapri chinchwad