News Flash

खडकवासला धरणात बुडून दोघांचा मृत्यू

पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

खडकवासला धरणात चौघे मित्र पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत आधिक तपास अभिरुची पोलीस स्टेशन करित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, खडकवासला धरणात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चार मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

मृत फिरोज नदाफ (वय १९) आणि वाजिद सय्यद (वय १८) हे दोघे ही बाबा खान वस्ती वारजे माळवाडी येथे राहणार आहेत. हे दोघे ही पावणे चार वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. त्यांना बाहेर काढून तत्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या दोघांची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा आधिक तपास करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 11:49 pm

Web Title: two youth died in khadakwasla dam
Next Stories
1 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जेबीजीव्हीएस’कडून इ-लर्निंग संच
2 सांगवडे येथे राजकीय वादातून एकाची निर्घृण हत्या
3 न्यायपालिकांवर राजकीय हस्तक्षेप वाढला