30 September 2020

News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागा संसदेत नव्हे तर प्राणीसंग्रहालयात-उमर खालिद

शहिद हेमंत करकरे यांना भारतरत्न देण्याची केली मागणी

२०१४ च्या आधी एक घोषणा दिली जात होत होती. ‘देखो देखो कौन आया गुजरात का शेर आया’ २०१४ नंतर गुजरात येथील वाघ दिल्लीच्या संसदेत बसला आणि पंतप्रधान झाला. आम्हाला वाघ नको होता. आम्ही तर एक माणूस मागितला होता. वाघ तर माणसांना खाऊन टाकतो. जर गुजरात येथील हा नमुना वाघ आहे. तर त्यांची जागा संसद नाही प्राणी संग्रहालय आहे अशी टीका उमर खालिद यांनी उडवली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

खालिद म्हणाले, “२०१४ च्या आधी एक घोषणा दिली जात होत होती. ‘देखो देखो कोण आया गुजरात का शेर आया’ २०१४ नंतर गुजरातचा वाघ दिल्लीच्या संसदेत बसला आणि पंतप्रधान झाला. आम्हाला वाघ नको होता. आम्ही तर एक माणूस मागितला होता. वाघ माणसांना खाऊन टाकतो. जर गुजरात येथील हा नमुना वाघ आहे. तर त्यांची जागा संसद नाही चिडीया घर आहे. आम्हाला असा माणूस हवा होता ज्याच्याकडे डोक्यासह हृदयही असतं. आता सांगितलं जातंय कागदपत्रं दाखवा. आम्ही कागदपत्रं दाखवणार नाही. कोणत्याही अधिकाऱ्याला घरात येऊ देणार नाही. क्यूँ की हिंदुस्थानके साथ कागज का नहीं दिल का रिश्ता है” असंही खालिद यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांना सलाम करतो, काही दिवसांपासून महाराष्ट्रात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी एक उदाहरण ठेवलं. कारण, यूपी, आसामसह ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे. तिथे पोलीस लाठीचार्ज करतात असा आरोप देखील भाजपावर केला आहे.

देशात हेमंत करकरे यांचा आम्ही सन्मान करतो, मोदी जी तुम्ही ज्या पोलिसांचा सन्मान करता त्यात शाहीद झालेल्या हेमंत करकरे यांचा समावेश आहे का? असा सवाल करत भाजपाच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी करकरे यांना अपमानित केले. या लोकांचा एकच उद्देश आहे..सत्ता आणि पैसा. हे म्हणतात सावरकर यांना भारतरत्न देणार, तुमच्यात हिंमत असेल तर शहिद हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खालिद यांनी दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 12:10 pm

Web Title: umar khalid slams pm narendra modi on various issue scj 81
Next Stories
1 साखर उद्योगातील अडचणींवर उपायमंथन
2 ‘हायपरलूप’ प्रकल्पाला महाविकास आघाडीचा खोडा?
3 गोधडी नि घोंगडी जपू द्या की रं.!
Just Now!
X